अभिनेते दिलीप प्रभावळकर सुखरूप
टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे काल पुण्यात निधन झाले. याच्या बातम्याही आज वर्तमानपत्रात आणि टीव्ही चॅनलमध्ये प्रसिद्ध झाल्या. पण या बातमीनंतर सोशल मीडियावर काही खोडसाळ प्राण्यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बाबत वाईट बातमीच्या पोस्ट धडाधड टाकल्या. पण ही बातमी खोटी आहे, याची पुष्टी 24taas.com करत आहे.
मुंबई : टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे काल पुण्यात निधन झाले. याच्या बातम्याही आज वर्तमानपत्रात आणि टीव्ही चॅनलमध्ये प्रसिद्ध झाल्या. पण या बातमीनंतर सोशल मीडियावर काही खोडसाळ प्राण्यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बाबत वाईट बातमीच्या पोस्ट धडाधड टाकल्या. पण ही बातमी खोटी आहे, याची पुष्टी 24taas.com करत आहे.
प्रभावळकरांबाबतची ही अफवा अनेकांना खरीही वाटली. या संदर्भात झी २४ तासच्या कार्यालयात अनेकाचे फोन आले. तसेच झी २४ तासच्या वेबसाइटवर विचारणा करण्यात आली. पण आम्ही एक जबाबदार माध्यम म्हणून त्यांना बातमी खोटी असल्याचे सांगितले. झी २४ तासने चौकशी केली असता दिलीप प्रभावळकर हे आपल्या पुण्याच्या राहत्या घरी सुखरूप आहेत.
नावामुळे झाला गोंधळ
दिलीप पाडगावकर आणि दिलीप प्रभावळकर हे जवळपास सारखे नाव वाटत असल्याने अनेकांनी बातमीची खात्री न करता या बातमीवर विश्वास ठेवायला सुरूवात केली.
व्हॉट्अप म्हणजे भगवतगीता नाही...
सोशल मीडिया म्हणजे आज काल भगवत गीता झाली आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूकवर जे काही आले ते खरे मानण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे या काळात माध्यमांनी आपली विश्वासार्हता टिकवली आहे आणि सामाजिक भान जपले आहे.
अभिनेत्यांच्या निधनाच्या अफवा
काही काळापूर्वी अमिताभ बच्चन, रेखा, नाना पाटेकर, लता मंगेशकर, हनी सिंग आणि बऱ्याच अभिनेत्यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. पण त्या खोट्या होत्या.