सलमानच्या जीवनातील अभिनेत्रींचा प्रेमप्रवास
बॉलिवूडचा दबंग खान नेहमी चर्चेत असतो. त्याच्या चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे तो नेहमी लोकांच्या चर्चचा विषय बनतो. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पाहा कसा होता त्याचा जीवन प्रवास.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान नेहमी चर्चेत असतो. त्याच्या चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे तो नेहमी लोकांच्या चर्चचा विषय बनतो. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पाहा कसा होता त्याचा जीवन प्रवास.
कॅटरिना कॅफ : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कॅफ आणि सलमान खान यांच्यातील संबंध हे जिव्हाळ्याचे होते. पण २०१० साली या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
लुलिया वन्तूर : सलमानचे प्रेमसंबंध रोमानियन अभिनेत्री लुलिया वेन्तुरसोबत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. सलमानच्या वाढदिवशी दोघांमध्ये थोडं भांडणही झालं अशा एका तेथे उपस्थित व्यक्तीने देखील सांगितलं होतं.
ऐश्वर्या राय : सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबतचे सलमानचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले. १९९९ साली आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढली. पण लगेचच २००२ मध्ये दोघे एकमेकांपासून दूर झाले. सलमान खान तिला आणि तिच्या कुटुंबियांना छळत असल्याची तक्रार एश्वर्याने पोलिसांकडे केली होती.
संगीता बिजलानी : बॉलिवूडचा दबंग खानचं लग्न हा चर्चेचाच विषय. पण सलमान यावर बोलणं नेहमी टाळतो. संगीता बिजलानी या अभिनेत्रींबरोबर त्याचे नाव जोडले गेले होते.
स्नेहा उल्ला : एश्वर्यासारखी दिसणारी स्नेहा उल्ला हिला सलमानने बॉलीवूडमध्ये आणलं. सलमानला तिच्यात आपले प्रेम दिसल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. 'लकी : नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटात एकत्र काम केलेल्या या दोघांची जवळीक फार काळ टिकू शकली नाही.
सोमी अली : सलमान खानने पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली सोबत डेटिंग केल्याचीही चर्चा होती. दोघांचा एक चित्रपट दोघांमधील वादामुळे प्रदर्शित न झाल्याचंही बोललं जातं.
जर्मन मॉडेल क्लाउडिया सिसला, झरीन खान, महेक चहल आणि हॅझेल कीच यांच्याबरोबरदेखील सलमानचे नाव जोडले गेले होते.