मुंबई : तारक मेहतामधील अभिनेत्री गरिमा गोएलला तिच्या घराती नोकराने विष दिल्याची घटना गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला घडली होती. यानंतर गरिमा तिचे पती धर्मेश ठकराल आणि मुलगा आश्रय याला रुग्णालयाक दाखल करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२४ फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारासा ती घरी आली. यानंतर तिने कुटुंबासोबत जेवण केले. मात्र खाताना डाळीचा स्वाद तिला कडवट लागला आणि डाळीचा रंगही वेगळा होता. जेवल्यानंतर काही वेळात गरिमा तिचे पती धर्मेश आणि मुलाला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. तब्येत अधिकच बिघडल्याने अखेर त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


या घटनेनंतर आरोपी नोकर संतोष फरार झाला मात्र नाशिकजवळ त्याला अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच नोकर संतोषला कामावर ठेवण्यात आले होते. लूटण्याच्या इराद्याने त्याने हे कृत्य केले. संतोषने खाण्यात धतुरा मिसळला होता. 


काही दिवसांपूर्वी गरिमाने तारक मेहतामध्ये छोटीशी भूमिका केली होती.यापूर्वी गरिमाने सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा आणि गुलमोहर ग्रँड या सिरीयल्समध्येही काम केलेय.