मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा १८ जुलैला ३४ वर्षांची झालीये. प्रियांकाचा जन्म १९८२मध्ये आजच्याच दिवशी जमशेदपूरमध्ये झाला होता. नुकत्याच एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या लव्ह लाईफबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी नेहमी रिलेशनमध्ये होते मात्र कधी डेटवर गेले नाही. कोणासोबत अचानक डेटवर जाण्याची संकल्पना भारतात नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही एकमेकांना उत्तरे देण्यासाठी बांधील असता. मात्र डेटिंगमध्ये असे नसते. 


मिस वर्ल्ड बनण्याआधी प्रियांकाचे नाव असीम मर्चेंटशी जोडले गेले होते. मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर प्रियांकाने त्याच्याशी ब्रेकअप केले. 


अंदाज या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियांकाचे नाव लग्न झालेल्या अक्षय कुमारशी जोडले गेले. या दरम्यान अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल यांच्यात मतभेद सुरु असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. 


जेव्हा प्रियांकाच्या घरी इनकम टॅक्स विभागाने छापा टाकला तेव्हा तिच्या घरी आधीपासून शाहीद उपस्थित होता. त्यानंतर त्यांच्या अफेयरची चांगलीच चर्चा बीटाऊनमध्ये रंगली. 


शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांच्या अफेयरच्या चर्चा फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप रंगल्या. त्यानंतर शाहरुख आणि गौरी यांच्यात मतभेद झाल्याचेही बोलले जाते. तसेच त्यानंतर गौरीने शाहरुखला वॉर्निंग दिली होती की तो पुन्हा प्रियंकासोबत काम करणार नाही. 


लव्हस्टोरी २०५० चित्रपटादरम्यान प्रियंकाचे नाव हरमन बवेजाशी जोडले गेले.