मु्ंबई : अभिनेत्री अदिती राव हैदरी आता तामिळ भाषेत बोलतांना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

का शिकते अदिती तामिळ ? 

सिनेदिग्दर्शक मणिरत्नम यांच्या एका तामिळ रोमँटिक चित्रपटाकरिता अदिती तमिळचे धडे गिरवतेय. फिल्म युनिटच्या सूत्रांनुसार मणिरत्नमने अदितीला फिल्मचे शूटिंग व्यवस्थित व्हावे यासाठी शूटिंग सुरू होण्यापूर्वीच तामिळ शिकायला सांगितलंय. मात्र अजून हे नक्की कळले नाही की तिच्या लाईन्स तीच डब करणार की कुणी दुसरं...

या सिनेमात तामिळ अभिनेता कार्थी मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात तो एका पायलटच्या भूमिकेत दिसेल.

या सिनेमाला संगीत ए. आर. रेहमान यांनी दिलं असून त्याने ते शूटिंग सुरू होण्याच्या आधीच पूर्णही झालंय. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.