मुंबई : पॉप सिंगर जस्टीन बीबरनंतर ग्रँड परफॉर्मंस देणारा प्रसिद्ध ब्रिटिश सिंगर आणि दोन वेळा ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता शीरन भारतात येणार आहे. तो नोव्हेंबरमध्ये भारतात कॉनसर्ट करणार आहे. 'शेप ऑफ यू' सिंगरने बुधवारी याची घोषणा केली. नवा अल्बम 'डिवाइड'च्या प्रचारासाठी तो 'वर्ल्ड टूर' करणार आहे. पण त्याचा कार्यक्रम कोठे होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीरन १८ नोव्हेंबरला मुंबईमध्ये परफॉर्म करणार आहे. शीरन मुंबई सोबतच तायपेई, ओसाका, सियोल, टोकियो आणि बँकॉकमध्ये देखील परफॉर्म करणार आहे. शीरनचा भारतात हा दुसरा कार्यक्रम आहे. याआधी २०१५ मध्ये त्याने महालक्ष्मी रेसकोर्समध्ये परफॉर्म केला होता.


जस्टीन बीबर आणि कोल्डप्ले नंतर शीरन असा तिसरी आर्टिस्ट हे जो भारतात परफॉर्म करणार आहे. कोल्डप्लेने नोव्हेंबर 2016 मध्ये भारतात परफॉर्म केला होता. शीरन सध्या जगात टॉप सिंगर्समध्ये आहे. मार्चमध्ये त्याचा तीसरा अल्बम 'डिवाइड येणार आहे.