ऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अत्यवस्थ
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अद्यापही जैसे थेच आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ऐश्वर्याची चिंता वाढलीये.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वडिलांची प्रकृती अद्यापही जैसे थेच आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ऐश्वर्याची चिंता वाढलीये.
मंगळवारी ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांच्या प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रिपोर्टनुसार, अद्यापही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीये.
कृष्णराज यांना आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक नियमितपणे रुग्णालयात येत आहे. अमिताभ बच्चन आणि मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रक्टर यांनी नुकतीच रुग्णालयात जात कृष्णराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.