मुंबई : यंदाच्या रिओ ऑलिंपिकसाठी भारतीय चमूचा गुडविल अॅम्बेसिडेर म्हणून बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या नियुक्तीला आता ऐश्वर्या रायनेही विरोध केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ऐश्वर्या रायच्या नावाने सलमानविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून सलमानला अॅम्बेसिडेर पदावरुन हटवण्यात यावे अशी मागणी याचिकेत केलीये. 


सलमानविरोधात अनेक खटले सुरु आहेत. त्यामुळे देशाची प्रतिमा बिघडू शकते. यामुळेच सलमानला अॅम्बेसिडेर पदावरुन हटवण्यात यावे असे दाखल केलेल्या याचिकेत म्हटलेय. 


गेल्याच आठवड्यात सलमानला गुडविल अॅम्बेसिडेरपदी नियुक्त करण्यात आले. त्याच्या नियुक्तीला यापूर्वी भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त, प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांनी विरोध दर्शविला होता.