नवी दिल्ली : बॉलीवूड सिंगर सोनू निगम याने सोमवारी सकाळी मशीदींवर होणाऱ्या अजानासंबंधी ट्वीट कले होते. यानंतर सोशल मीडियावर एक नवी चर्चा झडली आहे. सोनू निगम ट्विट केले की मी मुसलमान नाही पण मशीदीच्या अजानच्या आवाजाने सकाळी त्यांना का उठावे लागते. सोबत त्यांने हे पण लिहीले की कधीपर्यंत आपल्याला अशा धार्मिक परंपरांचे ओझे जबरदस्ती उचलावे लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरूवात झाली. कोणी सोनूच्या या वक्तव्याचे समर्थन केले तर कोणी टीका केली. तसेच सोनूच्या नावाने फतवाही जारी करण्यात आला. तसेच अनेकांनी सोशल मीडियावर सोनू निगमच्या या ट्विटच्या विरोधात त्यांच्या चित्रपटांवर बायकॉट करण्याचे अभियान सुरू केले. 


सोनूच्या या ट्वीटवर बिग बॉसचा माजी सदस्य  आणि अभिनेता एजाज खान याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. एजाज म्हणाला की सर्व धर्मांचा सन्मान व्हायला हवा. 


एका न्यूज चॅनलशी बोलताना एजाज म्हणाला, सोनू निगम माझा मित्र आहे. पण जो व्यक्ती माझ्या धर्माविरोधात बोलेल त्याला मी आदर देऊ शकत नाही. तो मोठा गायक आहे. पण आज माझ्या नजरेत तो झिरो आहे.  


सोनू जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा आमच्या पालकांनी सांगितले की सकाळी लवकर उठले पाहिजे, आरोग्यासाठी योग्य होते.  जो सकाळी लवकर उठतो त्याला अल्लाह जास्त काम देतो. अरिजित सिंग सकाळी ५ वाजता उठतो, रियाज करतो,त्यामुळे सर्व अभिनेत्यांसाठी तो गाणे गात आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. 


सोनूने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की ही गुंडागिरी आहे. यावर उत्तर देताना एजाज म्हणते की, ही मुसलमानांची गुंडागिरी नाही आहे. मुसलमानांनी अजून काहीच केले नाही, ते फक्त सहन करत आहे. सेक्युलर देशात फक्त मुसलमानांना टार्गेट केले जात आहे. इथे मुंबईत गणपतीत दहा दिवसासाठी मुंबई बंद होते तेव्हा आम्ही सर्व एक आहे. 


एजाजशिवाय बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यानेही सोनूच्या ट्वीटवर आक्षेप घेतला आहे. त्यावर सोनूने ट्वीट करून उत्तर दिले आहे.