मुंबई : खिलाडी अक्षय कुमारचा आगामी जॉली एलएलबी टू हा सिनेमा वादात सापडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या अॅड. अजयकुमार वाघमारे यांनी खंडपीठात याचिका दाखल केलीय. सिनेमातील दृष्यात न्यायालय, न्यायालयीन प्रक्रिया, न्यायाधीश आणि वकील यांचा अवमान केल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलंय. 


या सिनेमाच्या ट्रेलरवर बंदी आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.