मुंबई : जेव्हा बॉलिवूडमध्ये अॅक्श्नची गोष्ट येते तेव्हा एकच नाव सगळ्यांच्य़ा समोर येतं ते म्हणजे अक्षय कुमार. अक्षयचं अॅक्शनच्या प्रती असलेलं प्रेम त्याच्या अॅक्शनमधून झळकतं. अक्षय कुमारेने मार्शल आर्टचं देखील प्रशिक्षण घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय सध्या रुस्‍तम आणि हाऊसफल ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दरम्यानच त्याने वेळ काढत हैदराबादमधील नव्या आईपीएस ऑफिसरसोबत काही वेळ घालवला. अक्षयने आईपीएस ऑफिसरसोबत वॉलीबॉल आणि इतर काही खेळ खेळले.


अक्षयने एका आईपीएस ऑफिसरसोबत रिंगमध्ये फ्री किक आणि बॉक्सिंग देखील केली. या सगळ्य़ाचा आयपीएस ऑफिसर आणि अक्षय देखील खूप मज्जा घेत होता.


अभिनेता अक्षय कुमारने याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये तिने पती अक्षय कुमारचं खूप कौतूक केलं आहे.