मुंबई : बॉलीवूडच्या पडद्यावर प्रथमच अक्षयकुमार खलनायक साकारणार आहे. रजनीकांत च्या 2.0 या महत्त्वाकांक्षी चित्रपटात तो हे रूप साकारणार आहे. या चित्रपटामध्ये त्याचं रुप हे कमालीचं वेगळं असून पटकन न ओळखता येणारं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटामध्ये अक्षयने डॉ. रिचर्डचा रोल केला असून तो एक शास्त्रज्ञ असतो जो कावळ्यामध्ये रुपांतरीत होतो. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल स्टेडियममध्ये या चित्रपटाचं शुटिंग झालं आणि त्यावेळी अक्षयकुमारचा हा व्हिलनचा चेहरा सगळ्यांसमोर आला. 


सोशल मीडियावर अक्षयचं हे रुप व्हायरल होतंय. अक्षयच्या चाहत्यांना कदाचित धक्का बसेल असं खतरनाक रूप त्यानं स्वीकारलं आहे.