२६ जानेवारीसाठी अक्षय कुमारची आयडीया, शहिदांच्या कुटुंबियांना मिळणार १५-१५ लाख
अभिनेता अक्षय कुमारने शहिद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी एक नवीन आयडीया समोर आणली आहे. मंगळवारी फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने ही आयडीया सर्वांसोबत शेअर केली.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने शहिद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी एक नवीन आयडीया समोर आणली आहे. मंगळवारी फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने ही आयडीया सर्वांसोबत शेअर केली.
सर्व भारतीयांना सहजपणे शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी एक वेबसाईट आणि अॅप बनविण्याची इच्छा अक्षय कुमार याने व्यक्त केली. या आयडीयावर लोकांचे मत मागविले आहे.
कशी मदत देऊ इच्छितो अक्षय
अक्षय म्हणाला, मी २६ जानेवारीसाठी एक नवीन विचार शेअर करतो आहे. आपले सरकार लष्करातील जवान शहिद झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देतात. पण आपल्यातील काहीजण त्यांना मदत करू इच्छितात. पण त्यांना माहिती नाही की कशी मदत करावी. मी माझ्या परीने मदत केली आहे. का न आज शहिदांच्या कुटुंबियांना एका ठिकाणी भेट घडवून या.... डायरेक्ट माझ्या मनातून ही आयडीया आली आहे. ही एकदम बेकारपण आयडीया असेल. एक अशी वेबासाइट किंवा अॅप असायला पाहिजे की शहिद जवानाच्या निकटवर्तीयांचे, वडील, आई किंवा पत्नीचे डिटेल्स यात असेल. दुसऱ्या दिवशीच त्याच्या अकाउंटच्या डिटेल्स या अॅपवर अपडेट व्हायला हव्यात.
पाहा काय म्हणाला अक्षय