मुंबई : अक्षय कुमार कोर्टरूम या कॉमेडी सिनेमाच्या 'जॉली एलएलबी'च्या सिक्वेलमध्ये लीड रोलमध्ये असणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय या सिनेमात एका वकीलच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या सिनेमाच्या नव्या लूकसोबत नवा दिवस, 'जॉली एलएलबी 2'! हा आहे जजमेंट डे १० फेब्रुवारी २०१७. असं अक्षयने ट्विट केलं आहे.


अक्षय या फोटोमध्ये वकीलाच्या पोशाखात दिसत आहे. मिशी आणि कपाळावर लाल टिळा असा लूक या सिनेमामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लखनऊ आणि वाराणसीमध्ये या सिनेमाचं शूट करण्यात येणार आहे. ही एक संघर्ष करणाऱ्या वकीलाची कहाणी आहे. एक हिट अँड रन प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी अक्षय कुमार लढतांना दिसत आहे. आधीच्या सिनेमामध्ये अरशद वारसीने वकीलची भूमिका निभावली होती.