मुंबई : अक्षय कुमारच्या रुस्तम चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या यशामुळे अक्षय कुमार खुश झाला आहे. रुस्तम चित्रपटाचं प्रमोशन करणाऱ्या बॉलीवूडच्या कलाकारांचे अक्षयनं वेगळ्या शैलीत आभार मानले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकून या कलाकारांचे आभार मानले आहेत. आलिया भट्ट, सलमान खान, वरुण धवन, सोनम कपूर, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, फवाद खान यांनी रुस्तमचं प्रमोशन केलं होतं. या सगळ्यांसाठी अक्षयनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. 


पाहा अक्षय कुमारचा व्हिडिओ