मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले. गुरनाम सिंग यांच्या कुटुंबियांना अक्षय कुमार नऊ लाख रुपयांची मदत करणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐ दिल है मुश्कीलमधील पाकिस्तानी कलाकांरांबद्दल वाद मोठा वाद झाला. करण जोहरनं लष्कर कल्याण निधीला पाच कोटी रुपयांची मदत केल्याचं जाहीर केल्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला. करण जोहरला जबरदस्ती हा निधी द्यावा लागल्याचं बोललं जात असतानाच अक्षय कुमारनं मात्र सढळ हातानं मदत केली आहे.


याआधीही अक्षय कुमारची संवेदनशीलता अनेकवेळा दिसली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ज्या गावात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या गावाला दत्तक घेण्याचा निर्णय अक्षयनं घेतला. यासाठी अक्षय कुमारनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.