मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता याच प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी त्याच्या मदतीला येतोय जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली म्हणजेच बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षयकुमार त्याच्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरीता अक्षय कुमार या मालिकेत बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे हे विशेष भाग १ आणि २ फेब्रुवारीला अक्षय कुमार या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.