अक्षय कुमार पुन्हा एकदा होणार `शेफ`
खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१६ हे वर्ष खास असेल असं वाटतंय. वर्षाच्या सुरुवातीलाच त्चाच्या `एअरलिफ्ट`ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी उड्डाण केल्यानंतर आता तो एका चित्रपटात सैफ अली खानला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. `ओये टाइम्स`ने यासंबंधीचं एक वृत्त प्रकाशित केलंय. `शेफ` या प्रसिद्ध हॉलिवूड फिल्मचा हा बॉलिवूड रिमेक असणार आहे.
मुंबई : खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१६ हे वर्ष खास असेल असं वाटतंय. वर्षाच्या सुरुवातीलाच त्चाच्या 'एअरलिफ्ट'ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी उड्डाण केल्यानंतर आता तो एका चित्रपटात सैफ अली खानला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. 'ओये टाइम्स'ने यासंबंधीचं एक वृत्त प्रकाशित केलंय. 'शेफ' या प्रसिद्ध हॉलिवूड फिल्मचा हा बॉलिवूड रिमेक असणार आहे.
खरं तर ही भूमिका सैफ अली खानच्या वाट्याला आली होती. पण, आता फिल्मच्या निर्मात्यांना ही भूमिका अक्षयने करावी असं वाटतंय. त्याने याविषयीची घोषणा मात्र केलेली नाही.
अक्षय या फिल्ममध्ये एका रेस्टॉरंटमधल्या शेफची भूमिका करेल. विशेष म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी होण्याआधी अक्षय कुमार बँकॉकमध्ये एका हॉटेलमध्ये शेफ म्हणूनच काम करत होता. त्यामुळे या फिल्मसाठी त्याच्याशिवाय चांगला अभिनेता कोण असेल.
'शेफ' ही हॉलिवूड फिल्म २०१४ मध्ये रिलीज झाली होती. यातील शेफ रेस्टॉरंटच्या मालकाचा दबाव झुगारुन स्वतःचा एक फूड ट्रक सुरू करतो, त्याच्यातील शेफच्या गुणांशी मात्र तडजोड करत नाही असा या फिल्मचा विषय आहे.