मुंबई : आपल्याला माहीत आहेच की बॉलीवूडमधील अनेक कलाकार आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलत नाहीत. अनेकदा कोणी अभिनेता-अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्यास ते सिक्रेट ठेवले जाते. मात्र बीटाऊनमधील एक सिक्रेट उघड झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लंडनमध्ये एकत्र वेळ घालवतायत. हे दोघेही एअरपोर्टवर एकत्र दिसले होते. 


मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि सिद्धार्थ सुट्टीसाठी बाहेर जाण्यापूर्वी आलियाने तिच्या जुहूच्या घरी डिनर पार्टी ठेवली होती. 


यावेळी सिद्धार्थची ओळख करुन देण्यासाठी तिने तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना बोलावले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले.