अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलची बाजी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराजराजे भोसले यांच्या समर्थ पॅनेलनं आघाडी घेतलीय. समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर विजयी झाल्यात.
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराजराजे भोसले यांच्या समर्थ पॅनेलनं आघाडी घेतलीय. समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर विजयी झाल्यात.
अभिनेता गटातून चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रियाशील पॅनेलचे प्रमुख विजय पाटकर विजयी झाले आहेत. तर दिग्दर्शन विभागातून क्रियाशील पॅनेलचेच सतीश बिडकर विजयी झाले आहेत. याशिवाय समर्थ पॅनलच्या चैताली डोंगरे रंगभूषा विभागातून, बाळा जाधव कामगार विभागातून, शरद चव्हाण ध्वनीरेखक विभागातून आणि निर्मिती व्यवस्था- व्यवस्थापकीय यंत्रणा विभागातून संजय ठुबे हे विजयी झालेत.
अत्यंत धीम्या गतीनं सुरु असलेली ही मतमोजणी मध्यरात्री सुमारे एक वाजेपर्यंत सुरु होती. मतमोजणी तब्बल चार तास उशिरानं सुरु झाली. ही प्रक्रिया इतक्या संथगतीनं सुरु होती की काही उमेदवार आणि सभासदांनी चक्क निवडणूक मतमोजणी कार्यालयातच झोप काढली.