मुंबई : बॉलीवूड कलाकारांबाबत अनेक अफवा व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अफवा व्हायरल होत होती. तसेच व्हॉट्सअॅपवरही अशा प्रकारचे मेसेज फिरत होते. पण तसं काहीही नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैवाहिक जीवनात खुश नसल्याने ऐश्वर्याने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या यावर अमिताभ बच्चन यांना विचारले असता त्यावर त्यांनी फक्त हसत प्रतिक्रिया दिली पण बोलणं टाळलं.


हिमेश रेशमिया आणि यूलिया वंतूर यांच्या म्यूजिक अल्बम 'ये है मौसिकी'च्या लाँचिंगसाठी अमिताभ उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलत असतांना त्यांना हा प्रश्न विचारला गेला पण त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


अमिताभ यांनी हिमेशचं कौतूक केलं. 'तो खूपच टॅलेंटेड असल्याचं त्यांनी म्हटलं. हिमेश गातो आणि म्यूझिक कम्पोज पण करतो हे खूप अवघड काम आहे. माझ्यात त्याच्या इतकं टॅलेंट नाही. मला नाही माहित की त्याने म्यूझिक लॉन्चिगला मला का बोलावलं.'


पाहा व्हडिओ