मुंबई :  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच सुरू असलेल्या मुलाखतीतून अमिताभ बच्चन उठून गेले.  या दुःखाच्या समयी विनोद खन्ना यांच्या कुटुंबासोबत असावे म्हणून बिग बी यांनी तडकाफडकी मुलाखत सोडण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद खन्ना यांचे रिलायन्स रुग्णालयात ११ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. कर्करोगामुळे ते अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. 


विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपट सोबत केले आहेत. यात रेश्मा,  मुक्कदर का सिकंदर, इन्साफ, परवरीश, अमर अकबर अॅन्थॉनी, हेराफेरी, गुड्डी, रेश्मा और शेरा, खून पसिना यां चित्रपटांचा समावेश आहे.