COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. कधी नव्याचा फोटो चर्चेत असतो, तर कधी व्हिडीओ.


नव्या नेहमीच प्रत्येक वेळी सुंदर दिसून येते. सोशल मीडियावर नव्याचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात नव्या मनमोकळेपणाने नाचतेय.


हा व्हिडीओ 'ipopdiaries' नावाच्या अकाऊंटवर इंस्टाग्राम शेअर झाला आहे. हा नव्याचा व्हिडीओ असल्याचं नवभारत टाईम्सने आपल्या बातमीत म्हटलंय.
आपल्या सुट्या संपवून नव्या आपल्या मित्रांसोबत ज्यात शाहरूखचा मुलगा आर्यनही आहे, ते सर्व सुट्ट्या एन्जॉय करतायत. 


हा व्हिडीओ तेथूनच शेअर करण्यात आला असल्याचं नवभारत टाईम्सने म्हटलं आहे.समुद्रात मेगन ट्रेनर गाण्यावर नव्या डान्स करताना दिसतेय. 


व्हिडीओ पाहून नव्या सुट्टया एन्जॉय करतेय असं दिसतंय. बिझनस ऑफ सिनेमा या यू-ट्यूब चॅनेलवर सर्वात आधी हा व्हिडीओ अपलोड झाला आहे.