अमृता राव आज अडकणार `विवाह`बंधनात
बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम आहे असंच म्हणावं लागेल.
मुंबई: बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम आहे असंच म्हणावं लागेल. उर्मीला मातोंडकर, प्रीती झिंटा आणि बिपाशा बासूनंतर आता अभिनेत्री अमृता राव आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
रेडिओ जॉकी अनमोलबरोबर अमृता रावचं आज लग्न होणार आहे. सात वर्षांच्या प्रेमानंतर आज हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. या लग्न सोहळ्याला दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच बोलवण्यात आलं आहे.
गेल्या सात वर्षांपासून अमृतानं अनमोलबरोबरचं आपलं नातं कधीच सार्वजनिक केलं नव्हतं. अमृता सध्या मेरी आवाज ही पहचान है या मालिेकेमध्ये काम करत आहे. इश्क-विश्क या चित्रपटातून अमृतानं बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं, तर सत्याग्रह हा तिचा शेवटचा चित्रपट होता.