मुंबई : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट मुंबई एयरपोर्टवर एका फोटोग्राफरवर त्याचा फोटो काढल्यामुळे त्याच्यावर धावून गेला. फोटोग्राफरला त्याचा फोटो काढायचा होता पण हे पुलकितला आवडलं नाही आणि तो त्या फोटोग्राफरवर भडकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलकित आणि यामी गौतम यांचा नुकताच जुनूनियत हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्याच्या प्रमोशनकरून तो मुंबईला परतला होता. जेव्हा दोघे मुंबई एयरपोर्टवरुन बाहर आले तेव्हा तेथे उपस्थित एका फोटोग्राफरने त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटोग्राफरवर पुलकित भडकला आणि त्याच्यावर जोरजोरात ओरडू लागला.


यामी आणि पुलकित यांच्यातील संबंधामध्ये काहीतरी वाद झाल्याच्या चर्चा आहेत. त्यांचा जुनूनियत हा सिनेमा देखील काही खास कमाल न करु शकला नाही.