मुंबई : बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी मिर्झया या चित्रपटातून तो बॉलीवू़डमध्ये प्रवेश करतोय. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झालाय.


राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय. दरम्यान, हर्षवर्धन या चित्रपटात कोणत्या लूकमध्ये दिसणार आहे तसेच त्याची काय भूमिका असेल याबाबत माहिती मिळालेली नाही. 


या टीझरमध्ये हर्षवर्धन एका बाईकवरून अभिनेत्री सैयमी खेर हिचा पाठलाग करताना दिसतोय. तर एका सीनमध्ये ते दोघं एकत्र दिसतायत.