मुंबई : तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.


एआयबीमधील कलाकार तन्मय भट्टने सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य आणि खालच्या भाषेत विनोद केले होते, त्यावर अंजली तेंडुलकर यांनी ट्वीटरवर कॉमेडियनना अप्रत्यक्षपणे समज दिली आहे.