ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडेचं ट्विट
सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामध्ये आता भर पडली आहे ती अंकितानं केलेल्या ट्विटची.
मुंबई: सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामध्ये आता भर पडली आहे ती अंकितानं केलेल्या ट्विटची.
कधीही एकटं वाटून घेऊ नकोस, मी तुझ्या मनात आणि आयुष्यात कायम राहीन, असं ट्विट अंकितानं केलं आहे.
अंकिताचं हे ट्विट सुशांतला दिलेला मेसेज आहे, का दोघांच्या ब्रेक अपबाबत सुरु असलेल्या चर्चांचं उत्तर आहे, हे अंकिताच सांगू शकेल.
तर सुशांतसिंग राजपूतनंही एक ट्विट केलं आहे. तुला माझं शांत राहणं समजत नसेल तर तुला माझे शब्दही समजणार नाहीत, असं ट्विट सुशांतनं केलं आहे.
गेल्या 6 वर्षांपासून सुशांत आणि अंकिता रिलेशनशीपमध्ये होते, तर मागच्या 2 वर्षांपासून हे दोघं एकत्र राहत होते. पण सुशांत आणि परिनिती चोप्रा या दोघांमध्ये जवळीक वाढत चालल्यानं या दोघांचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा आहेत.
सुशांतच्या बॉलीवूडमधल्या कामाला सुरुवात झाल्यामुळे या दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे या दोघांनीही वेगळं व्हायचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.