मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आता बॉलिवूडमधूनच आवाज उठताना दिसतो आहे. 


सिनेनिर्माता अनुराग कश्यपने सलमानच्या वादग्रस्त विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. “सलमानचं वक्तव्य विचारशून्य आणि मुर्खपणाचं आहे.” अशी टीका अनुराग कश्यपने सलमानवर केली. शिवाय, सलमानच्या मुलाखतीदरम्यान वादग्रस्त वक्तव्यानंतर हसणाऱ्या पत्रकारांवरही अनुरागने निशाणा साधला.
 
याआधी सलमानच्या बलात्काराच्या त्या विधानावर अभिनेत्री कंगना राणावतनेही नाराजी व्यक्त केली होती.