मुंबई : अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या सैराटची चर्चा बॉलीवूडमध्येही सुरु झालीये. २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप यांनीही सैराटचे तोंडभरुन कौतुक केलेय. आश्चर्यचकित करणारा सिनेमा आहे. हा सिनेमा तुम्हाला हसवतो, प्रेमात पाडतो, मात्र तितक्याच ताकदीने वास्तवाचीही जाणीव करुन देतो. खूप साऱ्या भावना सैराट... अस त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.


अजय-अतुलचं दमदार संगीत, नागराज मंजुळेचं दिग्दर्शन आणि रिंकू-परश्या जोडीची कमाल केमिस्ट्री यामुळे प्रदर्शनाआधीच या चित्रपटातील गाण्यांनी आणि ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. 


बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट मोठी झेप घेईल अशा शक्यता व्यक्त केल्या जातायत. वीकेंडचे सगळे शो आधीच हाऊसफुल्ल झाले होते.