मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे आज कायदेशीर दृष्ट्या विभक्त झाले आहेत. आज मुंबईतील वांद्रे कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यांसंबंधी असलेली ओढाताण आता संपली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाच्या अर्जावर आज शिक्कामोर्तब केले. यामुळे मलायका आणि अरबाज यांचा १८ वर्षांचा संसार संपला आहे. 


गेल्या वर्षी नोव्हेंबर रोजी दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्याला आज मंजुरी मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार यांचा मुलाग अरहान याची कस्टडी मलायकाकडे असणार आहे. तर अरबाज आपल्या मुलाला वाटेल तेव्हा भेटू शकतो. 


मलायका आणि अरबाजची वांद्रे कोर्टाबाहेरचा फोटो व्हायरल होत असतून यात त्याने व्हाईट शर्ट आणि ब्लू कॅप घातली आहे. तर मलायका व्हाईट टॉपमध्ये दिसत आहे. 


या सहा महिन्यात दोन्ही स्टारला अनेक ठिकाणी एकत्र दिसत होते. तसेच जस्टीन बिबरच्या शोमध्येही एकत्र दिसले होते.