आर्ची आणि परशा होणार `कास्टिंग काऊच`मध्ये सैराट
निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या ‘कास्टिंग काऊच’ या वेबमालिकेत लवकरच आर्ची आणि परशा सैराट होणार आहेत. परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्यासोबतचा कास्टिंग काऊच चा टीझर नुकताच लाँच झाला आहे.
मुंबई : निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या ‘कास्टिंग काऊच’ या वेबमालिकेत लवकरच आर्ची आणि परशा सैराट होणार आहेत. परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्यासोबतचा कास्टिंग काऊच चा टीझर नुकताच लाँच झाला आहे.
अमेय वाघने आपल्या ट्विटर अकाउंटवरूनही याची लिंक शेअर केली आहे. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि अभिनेता अमेय वाघ यांनी सुरु केलेल्या भारतीय डिजीटल पार्टी या वेबचॅनलवर त्यांनी टीझर प्रदर्शित केला आहे.
कास्टिंग काऊच ही मराठीतील पहिली वेबमालिका आहे. आजवर याचे ३ एपिसोड प्रदर्शित झालेत. पहिल्या एपिसोडमध्ये राधिका आपटे त्यानंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये श्रीया पिळगांवकर आणि आता तिसऱ्या कार्यक्रमात दिल दोस्ती दुनियादारीतील सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर या तिघी उपस्थित होत्या.
एका चित्रपटासाठी कलाकारांना कास्ट या वेबमालिकेच्या मार्फत कास्ट केले जाते म्हणून याला ‘कास्टिंग काऊच’ नाव देण्यात आले आहे. सैराटच्या टीमला कास्टिंग काऊच मध्ये बोलाविण्याकरिता चक्क निपुण आणि अमेय नागराज मंजुळेंच्या दाराशी येऊन पोहाचलेत. ‘सैराट’च्या टीमसोबत नेमकं ‘कास्टिंग काऊच’चा एपिसोड कसा रंगणार, ह्याच्याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून आहे.