नोटा बंदीवरून अर्शद वारसीची पंतप्रधानांवर घणाघाती टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. नागरिकांना यामुळे त्रास होत असल्याचं सांगत बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीनं पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अर्शदनं मोदींवर निशाणा साधला.
मोदीजी तुम्हाला खरंच भारताला बदलायचं असेल तर एकतर्फी असलेले कायदे बदला. टॅक्सच्या माध्यमातून मी दिलेले पैसे मला परत मिळतील का असा सवाल अर्शदनं विचारला आहे. फसवणूक करणाऱ्या कंपनीला व्यवसाय करायची परवानगी दिली जाते पण टॅक्स भरणाऱ्या सर्वसामान्यांना त्रास दिला जातो. न्याय कुठे आहे, असंही अर्शद म्हणाला आहे.