आर्यन म्हणतो, मी शाहरुखचा मुलगा नाहीच!
बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान याच्याशी नातं सांगणं कुणाला आवडणार नाही... पण, असाही एक व्यक्ती आहे... ज्याचं शाहरुखशी रक्ताचं नातं आहे... पण, अनेकदा तो आपली लोकांपासून लपवतो...
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान याच्याशी नातं सांगणं कुणाला आवडणार नाही... पण, असाही एक व्यक्ती आहे... ज्याचं शाहरुखशी रक्ताचं नातं आहे... पण, अनेकदा तो आपली लोकांपासून लपवतो...
ही व्यक्ती म्हणजे शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान... आर्यन अनेकदा आपल्या मित्रांसोबत असताना सार्वजनिक ठिकाणी आपली ओळख लपवून ठेवतो, हे खुद्द शाहरुखनंच म्हटलंय. त्याचा आगामी सिनेमा 'फॅन'च्या एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान तो बोलत होता.
पण, आर्यन असं का करतो याचंही स्पष्टीकरण शाहरुखनं दिलंय. मित्र-मैत्रिणींसोबत असताना आर्यनला सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे राहणं आवडतं. तो केवळ किंग खानचा मुलगा आहे म्हणून उगाचचं महत्त्व दिलेलं अजिबात आवडत नाही, असं शाहरुखनं म्हटलंय.
त्याला एखाद्या सामान्य तरुणाप्रमाणे आपलं आयुष्य जगता यावं, यासाठीच आम्ही आर्यनला शिकण्यासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला, असंही शाहरुखनं स्पष्ट केलंय.