वाराणसी : प्रार्थनस्थळांवरच्या लाऊडस्पीकरविरोधात ट्विट करणाऱ्या गायक सोनू निगमच्या मदतीला आशा भोसले धावल्या आहेत. सोनू माझा गाणारा मित्र आहे. तो माझ्या मुलासारखा आहे, त्यामुळे मी त्याच्यासोबत आहे असं आशा भोसले म्हणाल्या आहेत.


मी मुस्ल‍ीम नाही आहे पण मस्जिदची अझान ऐकून रोज मला उठावं लागतं. कधी ही धार्मिक जबरदस्ती थांबणार आहे?' 'मला वाटत नाही की कुठल्या देवळात, गुरुद्वारामध्ये वीजेचा वापर करून त्या धर्माचं पालन न करणाऱ्या लोकांना जबरदस्ती झोपेतून उठवलं जातं. ही तर गुंडागर्दी आहे' असं ट्विट सोनू निगमनं केलं होतं. सोनूच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाला होता.