मुंबई : एस एसा राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवरील आपला दबदबा सलग १०व्या दिवशी कायम राखताना नवा इतिहास रचलाय. या सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत अद्याप कोणत्याही सिनेमाला जे जमले नाही ते करुन दाखवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तब्बल १००० कोटींची कमाई करत नवा विक्रम रचलाय. भारतात या सिनेमाने साधारण ८०० रुपयांची कमाई केली तर भारताबाहेर तब्बल २००हून अधिक कोटींचा गल्ला जमवलाय. 


तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी व्हर्जनमध्ये तब्बल ८००हून अधिक स्क्रीन्सवर हा सिनेमा झळकला होता.