मुंबई : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली २' या भारतीय सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड उद्ध्वस्त करत या सिनेमानं इतिहास रचलाय. त्यामुळेच की काय या सिनेमाचा तिसरा भागही येणार असल्याच्या आशा व्यक्त केल्या जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक राजामौली यांनी आता 'बाहुबली ३'बद्दल गंभीरतेनं विचार सुरू केलाय. 'बाहुबली २'च्या शेवटी एक डायलॉग आहे... 'अच्छा दादा क्या महेंद्र बाहुबली का बेटा भी राजा बनेगा, क्या मालूम शिव के मन मे क्या चल रहा है'


या डायलॉगमुळे 'बाहुबली ३'च्या बातम्यांना अधिकच हवा मिळालीय. राजामौली या प्रश्नापासून लांबच राहिले... परंतु, मीडिया रिपोर्टनुसार राजामौली यांनी आता तिसऱ्या भागावर काम सुरू केलंय. 


'बाहुबली २' या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर राजामौली यांनी प्रोड्युसर शोबू यांच्यासोबत एक बैठकही घेतलीय. यानंतर राजामौली यांचे पिता विजेंद्र प्रसाद यांना सिनेमाचं कथानक आणखी वाढवता येईल का? याची विचारणा करण्यात आलीय. 


अशातच त्यांचं एक जुनं ट्विटही व्हायरल होताना दिसतंय. यामध्ये त्यांनी 'बाहुबली ३' बनवण्याचा उल्लेख केला होता.