मुंबई :  गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची वाट पाह असलेला बाहुबली २ हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज झाला आणि या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीतील जवळपास बहुतांशी रेकॉर्ड तोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी नेहमी कोणत्याही चित्रपटाच्या कमाईत कमतरता येते पण बाहुबलीने चौथ्या दिवशी ४०.२५ कोटींची कमाई करून नवा विक्रम केला आहे. धर्मा प्रॉडक्शननुसार या चित्रपटच्या हिंदी व्हर्जनने एकूण १६८.२५ कोटीची कमाई केली आहे. 


तीन दिवसात ३०० कोटींची कमाई 


करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनने दिलेल्या आकडेवारीनुसार बाहुबली २ ने तीन दिवसात ३०० कोटींची कमाई केली आहे. त्यात हिंदीने १२८ आणि तमिळ, तेलगू, मल्याळम यांनी एकूण १७५ कोटी कमाविले आहे. 


बाहुबली २ ने पहिल्या सोमवारी ४०.२५ कोटींची कमाई केली. त्यामुळे हिंदी व्हर्जन १६८.२५ एकूण कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने ४१ कोटी, शनिवारी ४०.५० कोटी आणि रविवारी ४६.५० कोटी कलेक्शन केले आहे. 


केवळ चार दिवसात बाहुबलीने हिंदीमध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. शाहरूख खानचा रईस चार महिने कमाईच्या बाबतीत सर्वात पुढे होता. पण चार दिवसात बाहुबलीने मागे टाकले आहे.