मुंबई : बाहुबली 2 ने अनेकांना वेड लावले आहे. या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच विक्रमी कमाई केली. तर आमिर खानच्या दंगलीचाही रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबली-2 ने ऑनलाईन सिनेमा तिकीटांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. एका दिवसात 10 लाखांची ऑनलाईन तिकीट विक्री झाल्याचा दावा करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2016मध्ये आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. या सिनेमाचा एक रेकॉर्ड बाहुबली-2ने मोडला आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच दंगल सिनेमाचा रेकॉर्ड मोडलाय. आमिरच्या दंगल सिनेमाला बाहुबली-2ने मागे टाकले आहे.


एका दिवसात 10 लाख तिकीट विक्री झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा तिकीट विक्रीचा रेकॉर्ड दंगलने केला होता. आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली आहे. ही एका दिवसाची आहे. दक्षिण भारतीय सिनेमा असल्याने तामिळ, तेलगूमधील प्रेक्षकांची बाहुबली-2 ला जास्त पसंती दिसून येत आहे.