मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'बार बार देखो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लव्ह, रोमान्स आणि भावभावनांचा कल्लोळ यांत अडकलेलं सिनेमाचं कथानक... कॅट-सिदची केमिस्ट्री मात्र पाहण्यासारखी आहे. त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये भरपूर ट्विस्टही दिसतायत.  


नित्या मेहरा यांनी या सिनेमाद्वारे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलंय. काही दिवसांपूर्वी आलेलं या सिनेमातील गाणं 'काला चष्मा'नं प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलंय. हा सिनेमा या ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांसमोर येतोय.