मुंबई : काही दिवसांपूर्वी कपील शर्माचा मेणाचा पुतळा हा ब्रिटेनमधल्या मॅडम तुसाद म्यूझिअममध्ये ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. या म्यूझिअममध्ये अनेक प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचे मेणाचे पुतळा ठेवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी मात्र बॅडन्यूज ही आहे की कपिल शर्माचा असा कोणताही पुतळा बनवला जाणार नसल्याचं म्यूझिअमकडून सांगण्यात आलं आहे. 
पण म्यूझिअमने म्हटलं की, 'कपिल शर्माच्या नावाचा पर्याय दिल्या बद्दस धन्यवाद.'


म्यूझिअमकडून सांगण्यात आलं की, 'कोणत्याही व्यक्तीचा मेणाचा पुतळा बनवण्याचा जेव्हा निर्णय होतो त्याची माहिती वेबसाईट आणि सोशल मीडियावर देण्यात येते, त्यामुळे तुम्ही त्यावर अपडेटेड राहा.