मुंबई : आज वरुण धवन आणि आलिया भट स्टारर 'बद्रिनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. कसा आहे हा सिनेमा, काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी या सिनेमावर एक नजर टाकुया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2015साली दिग्दर्शक शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला, 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा आपण पाहिला..  या सिनेमानंतर वरुण, आलिया, करण जोहर आणि शशांक खेतान हीच टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 'बद्रिनाथ की दुल्हनिया' असं या सिनेमाचं नाव असून, हा सिनेमा आज रुपेरी पडद्यावर झळकलाय. 


अभिनेता वरुण धवन जो 'बद्रिनाथ की दुल्हनिया' या सिनेमात युपीचा छोरा बनलाय, बद्रिनाथ बनसल असं त्याच्या कॅरॅक्टरचं नाव आहे, तर दुसरीकडे राजस्थामध्ये वाढलेल्या वैदही त्रिवेदी या तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री आलिया भट्टनं. हे दोघं भेटतात, मग प्रेम होतं, मग लग्न ठरतं आणि त्यानंतर आलिया अर्थातच या सिनेमातली वैदही पळून जाते. आलिया का पळून जाते, त्यानंतर वरुण धवन अर्थातच या सिनेमातला बद्रिनाथ काय करतो या साठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल. 


दिग्दर्शक शशांक खेताननं या आधी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ती एक लव्हस्टोरी होती, हा सिनेमाही एक लव्हस्टोरी आहे, मात्र तरी सिनेमात अगदी सटल पद्धतीनं एक सामाजिक संदेश ही देण्यात आलाय. 


आजही आपल्या देशात अशी अऩेक गावं आणि शहरं आहेत जिथे महिलांना हवं तसं जगता येत नाही, त्यांना कोंडून ठेवलं जातं, त्यांची स्वप्न ही आय़ुष्यभर स्वप्नच राहतात. अशाच काहिशा पार्श्वभूमीवरचा 'बद्रिनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा आहे.


या सिनेमाला मिळतायत अडीच स्टार्स.