मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि आलिया यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याआधी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातून हे दोघे झळकले होते. आणि आता 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटातून ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नुकताच धर्मा प्रोडक्शनने चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. आलिया मस्त देशी वेशात दिसत असून वरुण थोडा हटके रावडी लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटातील सर्व शूटींग उत्तर भारतात पार पडणार आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १७ मार्च २०१७ ला प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.