मुंबई : बाहुबली 2 चित्रपटादरम्यान 5  मिनिटांपेक्षा जास्त ब्रेक नसावा किंवा ब्रेकमध्ये 5  मिनिटांपेक्षा जास्त जाहिराती नको, असा महसूल खात्याचा नियम आहे.मात्र हा नियम डावलून बाहुबली 2 चित्रपटादरम्यान 38 मिनिटांत 132 जाहिराती दाखवण्यात येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरून चित्रपटादरम्यान अनधिकृत जाहिराती दाखवणाऱ्या आयनॉक्‍स थिएटरसह राज्यातील सर्व मल्टिप्लेक्‍स आणि सिंगल स्क्रीन थिएटरवर कारवाई करण्याची मागणी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 


बाहुबली 2 च्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन, चित्रपट सुरु होण्याच्या आधी आणि इंटरव्हलमध्ये जाहिराती दाखवून सरकारचा कोट्यवधींचा करमणूक कर बुडवला जात आहे. इतकंच नाही तर थिएटर व्यवस्थापनाला वारंवार तक्रार आणि विनंती करुनही जाहिराती बंद केल्या नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.


विरोधी पक्ष नेत्यांचे पीए, कामगार मंत्र्यांचे पीए आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या पीएने चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिलं आहे.