`बाहुबली द कनक्लूजन`च्या क्लायमॅक्सचे शूटिंग आजपासून सुरू
गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या बाहुबलीचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वलचे नाव `बाहुबली द कनक्लूजन` असे असणार आहे. `बाहुबली द कनक्लूजन` या फिल्मचे शूटिंग आज हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू झाले.
मुंबई : गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या बाहुबलीचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वलचे नाव 'बाहुबली द कनक्लूजन' असे असणार आहे. 'बाहुबली द कनक्लूजन' या फिल्मचे शूटिंग आज हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू झाले.
किती झाला खर्च
सूत्रांच्या माहितीनुसार या फिल्मच्या क्लायमॅक्सकरिता तब्बल ३० करोडोंचा खर्च झालाय तर पहिल्या भागातील क्लायमॅक्सकरिता १५ कोटींचा खर्च झाला होता.
काय केलं क्लायमॅक्ससाठी
या क्लायमॅक्स सिन करीता केवळ खर्च झाला नाही तर अभिनेत्यांनीही भरपूर मेहनत घेतलीये. या सिनकरिता तेलगू चित्रपटांचा सुपरस्टार प्रभास, राणा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना एक आठवडा रिहर्सल करावी लागली.
फॅन्सच्या अपेक्षा वाढल्यात..
'बाहुबली..द बिगिनींग' मध्ये १२ मिनिटांचा वॉर सिक्वेन्सला चाहत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता 'बाहुबली द कनक्लूजन'कडून बाहुबली फॅन्सच्या अपेक्षा वाढल्यात.
शुटिंगचे फोटो व्हायरल...
मॅग्नम ओपसच्या टीमने चाहत्यांसाठी काही फोटोज शेअर केले आहेत. एकीकडे फोटोमध्ये फिल्मचे दिग्दर्शक एस एस राजामौली आपल्या टीमला कामाबाबत समजवत असतांनाचा फोटो आहे. तर दुसरीकडे प्रभास आणि राणा निर्मात्यासोबत मस्ती करतांना दिसतायत. शूटिंग सुरू होण्याआधीच सेटवरची मजामस्ती दाखवून चाहत्यांची उत्सुकता वाढवण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय.