मुंबई : सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलेला 'बाहुबली द कनक्लूजन' हा सिनेमा आज रिलीज होत आहे. सर्वांचीच उत्सुकता ताणलेला 'बाहुबली द कनक्लूजन' चित्रपट इतिहास रचण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमधल्या मल्टिप्लेक्समध्ये अॅडव्हानस् बुकींग फुल असल्याचं समजतंय. त्यामुळं पहिल्याच दिवशी बाहुबली १०० कोटींचा गल्ला जमवण्याची शक्यता आहे. 2015साली आलेल्या बाहुबली - बिगिनिंग या सिनेमानं तब्बल 650कोटींचा व्सवसाय केला होता. 


आता 'बाहुबली द कनक्लूजन' हा सिनेमा हे सगळेच विक्रम मोडणार असल्याची चर्चा रंगतेय. 'बाहुबली द कनक्लूजन' हा सिनेमा एकाचवेळी भारतात जवळपास 9000 पडद्यांवर झळकणार आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हा सिनेमा उद्या झळकणार आहे. 


याच बरोबर 'बाहुबली द कनक्लूजन' या सिनेमाचे तिकीट दरही गगनाला भिडतायेत. सिनेमाचं डिस्ट्रीब्यूशनही तगडं आहे. त्यामुळं हा सिनेमा इतिहास रचणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.