मुंबई : रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या 'बेफ्रिक्रे' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आयफेल टॉवरवर प्रदर्शित करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य चोप्रानं केलंय. या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच रणवीर आणि वाणीचे बरेच बोल्ड सीन्स दिसतायत. दोनच दिवसांत या व्हिडिओला एक करोडहून अधिक व्ह्यूज मिळालेत. 


या सिनेमाचं बहुतांश शूट पॅरिसमध्ये झालंय. हा सिनेमा येत्या ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांची मुलगी आदिरा हिचा पहिलाच वाढदिवस आहे.