मुंबई : सिनेनिर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 'पद्मावती' नावाचा सिनेमा तयार करत आहेत. पण, सिनेमा पूर्ण होण्यापूर्वीच राजपूत कर्नी सेनेनं जयपूरमध्ये सुरू असलेलं शुटिंग धिंगाणा घालत, तोडफोड करत बंद पाडलं... या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी आता कर्नी सेनेनं केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात दीपिका पदूकोण 'पद्मावती'च्या भूमिकेत आहे तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका करतोय. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जयपूरमध्ये संजय लीला भन्साळींवर हल्ला करण्यात आला. राजस्थानातल्या कर्नी सेनेनं त्यांच्यावर हल्ला केला. 


इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत कर्नी सेनेनं हा हल्ला केला. पद्मावतीनं शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचं स्त्रीत्व जपलं आणि अल्लाउद्धीन खिलजीचा स्पर्शही होऊ दिला नाही, असं म्हटलं जातं.


पण, भन्साळींच्या सिनेमात अल्लाऊद्दीन खिलजीचा ड्रीम सिक्वेन्स दाखवण्यात आलाय आणि त्यामध्ये रणवीर आणि दीपिकाचं म्हणजेच खिलजी आणि पद्मावतीचं इंटिमेट गाणं शूट करण्यात येत होतं... यालाच कर्नी सेनेचा विरोध होता. 


म्हणूनच संजय लीला भन्साळींवर हल्ला करण्यात आला... दरम्यान, आता अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीचा ड्रीम सिक्वेन्स ठेवणार नाही, असं भन्साळी यांनी स्पष्ट केलंय. 


त्यानंतर या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणही कर्नी सेनेनं केली. परंतु, आता या नावात बदल होऊ शकत नाही असं संजय लीला भन्साळी प्रोडक्शननं म्हटलंय. त्यानंतर, कर्नी सेनेनं जयपूरमध्ये भन्साळी यांना शुटिंग करण्याची परवानगी दिलीय.