मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हरबरोबर साखरपु़डा झाल्याच्या अफवा गेल्या काही दिवस सुरु आहेत. यावर आता बिपाशा बासूनं स्पष्टीकरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशाच्या बोटामध्ये हिऱ्याची अंगठी दिसल्यामुळे या बातम्या पसरल्या होत्या. पण माझ्या लग्नाबाबतची घोषणा मीच करीन, धीर धरा, उगाच अफवा पसरवू नका असं बिपाशा म्हणाली आहे.


गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्या लग्नाबद्दल चर्चा सुरु असते, पण हे माझं आयुष्य आहे असं ट्विट बिपाशानं केलंय आणि लग्नाबाबतच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.