मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने 'हेल्प अ चाइल्ड रिच ५' अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. स्वच्छ हात धुणे आणि साफ ठेवणे याबाबतची जागृकता आणण्याचं काम या अभियानामार्फत केलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोल हिंदुस्तान युनिलीवरची 'स्वच्छ आदत, स्वच्छ भारत' या अभियानाची अॅम्बेसेडर आहे. याबाबतीत आणखी प्रसार व्हावा यासाठी काजोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


काजोल म्हणते की, 'मी पंतप्रधानांना सांगितलं की कशा प्रकारे आम्ही मागील ४ वर्षापासून हे काम करतोय. याचा किती प्रभाव पडला आहे याबाबतचे आमच्याकडे आकडे देखील आहे, हा फक्त एक सिद्धांत नाही आहे.'


शाळेमध्ये हात स्वच्छ ठेवणे हे अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी सुविधा देखील दिल्या पाहिजे या बाबतीतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचं काजोलने सांगितलं आहे. पंतप्रधानांनी काजोलला म्हटलं की, 'तुम्ही सवय नाही तर विचार करण्याची पद्धत बदलत आहात, काय बरोबर आहे आणि काय चूक हे तुम्ही सांगत आहात.'